Tuesday, 23 August 2016

- मला उत्तर हवंय -

- मला उत्तर हवंय -


     सरती संध्याकाळ आहे. एका अप्रतिम पुस्तकाच्या वाचनानंतर मनावर एक प्रकारची अलौकिक तृप्ती आलेली आहे. खरंच अशा पुस्तकाचं कोणत्या शब्दात वर्णन करावं? simply no words to describe. पुस्तकाचा मस्त hang-over आलेला आहे. अर्थात हा अनुभव नवा आहे किंवा फक्त आजचाच आहे असं नाही. भूतकाळातही हा अनुभव अनेक वेळा आलेला आहे. वर्तमानात तर येतोच आहे आणि भविष्यातही येत रहाणारच आहे. मात्र आज त्यानंतर हातून घडत असलेली कृती एकदम नवीन आहे. विसंगतही आहे.

      एवढं magnificent पुस्तक वाचून झाल्यावर मी ताबडतोब हातात लेखणी घेऊन लिहायला बसावं? what a great contrast & what a great pleasure too. या वेळी मला एक शेर आठवतोय.

खुदीको कर बुलंद इतना
के हर तहरीरसे पहेले
खुदा बंदेसे खुद पूछे
बता तेरी रजा क्या है ।।

     म्हणजे, माणसानं स्वतःचीच उंची एवढी वाढवावी की त्या माणसावर संकट पाठवण्याआधी परमेश्वरानं खुद्द त्याच माणसाला विचारावं की बाबा रे तुझ्यावर कोणतं संकट पाठवू?

     अर्थात स्वतः लिहायला बसणं हेसंकटपरमेश्वरानं (मला विचारून) माझ्याकडे पाठवलेलं नाही; तर ते मीच माझ्यावर ओढवून घेतलंय. पण त्यातलंखुदीको कर बुलंदहे सर्वात महत्वाचं.

     मला नेमकं तेच जमत नाही. साक्षात तानसेन गाऊन गेल्यावर शाळेतल्या संगीत शिक्षकाला गावं असं वाटलं तरी त्याच्या गळ्याातून कसे आणि कोणते सूर बाहेर पडणार? exactly हेच feeling सारखं मनामधे येत रहातं. यावर उत्तम उपाय म्हणजे तानसेनाचं गाणं आणि गाढवाचं ओरडणं यातला फरकच ओळखता येणं. पण हेही भाग्य त्या विधात्यानं माझ्या नशिबी लिहिलेलं नाही. परमेश्वरानं मला घडवतानाच माझ्या शरीरात हाडामांसाप्रमाणेच साहित्य, संगीत, नाट्य, कला, आदि गोष्टींची फक्त आवडच नव्हे तरसमझदारी-जानकारीकोंबली आहे. त्यामुळे या सर्वच क्षेत्रात जिथे जिथे दिव्यत्वाची प्रचिती येते तिथे तिथे माझे कर आपोआप जुळतात. पण पुढे काय? पुढे या क्षेत्रात पुष्कळ काही करायची इच्छा असूनही मी काहीच करू शकत नाही; किंवा केलंच तर असं करतो की इतरेजनांचेकरमाझ्या दिशेनेकोपरापासूनजुळतात. हे असं का होतं? तर - ‘खुदीको कर बुलंद इतनाहे कळल्यामुळे किंवा कळून वळल्यामुळे. या अशा वृत्तीमुळेच मी मग, ‘कलावंत मोठा बनतो तो आमच्यासारख्या सच्च्या रसिकांमुळेच,’ असा typical middle-class mentality ला शोभेल असा विचार करून दुसऱयांचं समाधान करायचा प्रयत्न करतो. पण स्वतःचं समाधान झालेलं नसतंच.

     अशा अवस्थेत डोक्याचा पारगोविंदाहोऊन जातो - अतिशय गोंधळ उडतो. डोक्यात विचारांची वादळं उठतात. पण हेच विचार कागदावर उतरवायला गेलो तर पानं फडफडतात. ते विचारही दुसऱयांचे वाटू लागतात. आपल्यावर विचारचौर्याचा आरोप होण्याची आपल्यालाच भिती वाटू लागते आणि क्षणात inferiority complex चा attack येतो. पण मुळात माणूस विचार करायला शिकतो तरी कुठुन आणि कसा? लहानपणीच्या संस्कारांप्रमाणेच विचारशक्तीची वाढ होते. तर पुढे आपल्या आवडत्या पुस्तकातले किंवा आवडते विचार मनात रूजतात आणि आपलेच होतात. विचारशक्ती अशीच develop होत जाते. याचाच अर्थ असा की एखादा विचार जरी original वाटला तरी मुळात तो तसा नसतो. शेवटी nothing is new under the blue sky. तसा आपल्यापुरता प्रत्येकजण philosopher असतोच. फक्त साहित्यनिर्मितीच्या वेळी मनातील असंख्य विचारांतला नेमका आणि सुसंगत विचार पाहिजे तसा आणि पाहिजे त्यावेळी सुचणं यालाचप्रतिभाम्हणतात आणि तीअल्लाकी देनम्हणूनच मिळतेफक्त प्रश्न एवढाच आहे  की  ‘जानकारीचं रूपांतर स्वतंत्र प्रतिभेत करता येतं किंवा नाही. कारणजानकारीआणिसुप्त प्रतिभायातील फरक दर्शवणारी सीमारेषा इतकी पुसट असते की ती ज्याची त्याला सुद्धा कळत असेल की नाही याची शंकाच आहे.

     फ्लडलाईट्सच्या प्रकाशात असलेल्या नटसम्राटाचं अभिनय-नैपुण्य आपल्याला जाणवतं पण तरीही आपण मात्र अंधारातच असतो. तसंच काहीसं माझं.

     खरंच, प्रथितयश, देवतुल्य साहित्य-पुरूषोत्तमांच्या मनात एवढे नेमके, सुसंगत, सुंदर विचार कुठुन येतात? "दोन आण्यांची अफू खाल्ली की वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात," असं लो.टिळक (म्हणे) म्हणत असत. मग सदरसाहित्य-पुरूषोत्तमकाय वर्षोन् वर्ष अफूवरच जगतात, असं मानायचं? (मग सर्व चिनी माणसं जगातील सर्वात विचारवंत माणसं कशी झाली नाहीत?)

     एवढी वैचारिक उंची या साहित्यिक लोकांनी कुठुन मिळवली? दोरीच्या उड्या मारून मारून शारीरिक उंची वाढते ही एक fact आहे. पण विचारांच्या उड्या मारून मारून वैचारिक उंची वाढते काय?

     याचंच मला उत्तर हवंय. कारण हे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत चांगलं पुस्तक वाचून झाल्यावर येणारी तृप्ती लगेच spoil होणार आहे. स्वतःपुढे काहीतरी भव्य, उदात्त, विराट स्वरूप उभं आहे आणि त्यापुढे आपण अगदीच खुजे आहोत, हे feeling कायम रहाणार आहे.

     सध्या मात्रबेडकी बैल होण्याचा प्रयत्न करते त्यात प्राण गमावते,’ ही इसापनीतीतली गोष्टच मनात घट्ट रूतून बसलीय. पण डोळ्याांसमोर खुणावतो आहे तो मात्रखुदीको कर बुलंद इतना -’ हा शेर.

     इसापनीतीतली बेडकीची गोष्ट खरी कीखुदीको कर बुलंद इतना,’ हा शेर खरा?

     मला उत्तर हवंय.

     (लेखन काळ - १९८६)


------ xxx -------

No comments:

Post a Comment