Thursday, 7 December 2017

#५) माझे आवडते पुस्तक - मिरासदारी

#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
#) मिरासदारी

मिरासदारी / लेखक - .मा.मिरासदार (जन्म - १४ एप्रिल १९२७.)

@@  .मा.मिरासदार यांचा अल्पपरिचय  @@ 

     द.मा.मिरासदारमराठीतील आघाडीचे विनोदी लेखक, पत्रकार कथनकार... काही काळ पत्रकारी केल्यानंतर .मां.नी अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन शाळेत शिक्षक म्हणून काम केल्यानंतर पुढे ते मराठीचे प्राध्यापकही झाले.  

     द.मां.नी शंकर पाटील व्यंकटेश माडगूळकरांसमवेत कथाकथनाचे भरपूर कार्यक्रम केले. त्यांनी कथाकथनाची स्वतंत्र अशी एक मिश्किल शैली जोपासली.

     द.मां.च्या नावावर २४ कथासंग्रह तसेच काही लेखसंग्रह आणि 'मी लाडाची मैना तुमची' हे एक वगनाट्य, एवढी साहित्यसंपदा जमा आहे. याशिवाय १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यातील बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले; पण त्यातही 'एक डाव भुताचा' हा चित्रपट, त्यातील दिलीप प्रभावळकर रंजना ही नायक-नायिकेची जोडी विशेषतः अशोक सराफचं 'मास्तुरे' म्हणणारं भूत, या सर्व गोष्टी चिक्कारच गाजल्या. या चित्रपटात .मां.नी एक छोटीसी भूमिकाही केली.       

     द.मां.चे बालपण अकलूज पंढरपुरात गेले. पेशाने वकील असणाऱ्या त्यांच्या वडिलांकडे अनेक ग्रामीण भागातले पक्षकार येत असत. त्यायोगे विशेषतः ग्रामीण भागातील मनुष्य स्वभावाचे कंगोरे पाहून त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी ग्रामीण पार्श्वभूमीवर विपुल विनोदी कथालेखन केले.    

@@ @@

     द.मा.मिरासदार हे नाव मला प्रथम कधी माहित झालं असावं ? आठवण जास्तीत जास्त मागे खेचली तर या प्रश्नाचं 'माझ्या शालेय वयात' हेच उत्तर येतं. मला आठवतंय आम्हाला शाळेत असतांना मराठीच्या पुस्तकात एक छोटंसं नाटुकलं होतं. त्या नाटुकल्याची कथा काहीशी अशी होती - शास्त्रीय गायकाच्या गाण्यावर महाराज खुश होतात त्याला काहीही मागणं मागायला सांगतात. त्यावर तो गायक संगीताच्या प्रसारासाठी महाराजांनी काही खास प्रयत्न करावेत, असं महाराजांकडे मागणं मागतो. त्यामुळे, प्रजेनी सर्व व्यवहार, सर्व संवाद गाण्यातच केले पाहिजेत, अशी महाराज 'ऑर्डर' काढतात मग त्यामुळे खूप गम्मत-जम्मत होते... या नाटुकल्याचे लेखक म्हणून .मां.च्या नावाचा पहिला परिचय झाला. आम्हा मुलांना हे नाटुकलं - अभ्यासाचा धडा असूनही - भारी आवडलं. अर्थात ह्या नाटुकल्यातले संवाद काही ग्रामीण नव्हते. मग पुढे, प्रामुख्याने ग्रामीण विनोदी कथा लिहिणारे, .मा.मला इतके 'बक्कळ,' ‘मोssप’ अन 'मायंदाळ' कसे आवडायला लागले असावेत ? वास्तविक मी पूर्ण शहरी, मुंबईकर मध्यमवर्गीय मुलगा. पण तरीही ग्रामीण बोली भाषेचं आकर्षण मला कसं वाटलं असावं ?

     मला आठवतंय माझ्या लहानपणी वसंत सबनीस लिखित दादा कोंडक्यांचं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य अभूतपूर्व गाजत होतं आणि ते मी लहान असल्यामुळे प्रत्यक्ष बघितलं नसलं तरी, त्याबद्दल वाचायला मिळत होतं चर्चा झडलेल्याही कळत होत्या. गणेशोत्सवात शाहीर साबळे आणि राजा मयेकरांची ग्रामीण भाषा असलेली मुक्तनाट्यही होत असत त्यातली 'बापाचा बाप,' 'आबूरावाचं लगीन,' इत्यादी, कुठे कुठे जाऊन पाहिलेलीही होती. थोड्या काळानंतर माझ्या थोरल्या भावानी आमच्या सोसायटीसाठी .मां.चंच 'मी लाडाची मैना तुमची' हे लोकनाट्य नंतर वसंत सबनीसांचं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य; अशी दोन लोकनाट्ये लागोपाठच्या वर्षी केली होती त्यात मी ढोलकीही वाजवली होती. या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण बोलीचं मला खूपच आकर्षण वाटू लागलं होतं. याच्याच आगेमागे पु.. .पुं.सोबतच .मां.ची कथाकथनाची कॅसेट हातात पडली आणि 'शाळेतील समारंभ,' 'धोक्याचे वळण' आणि 'माझी पहिली चोरी' या तीन कथा .मां.च्या कॅसेट वरून असंख्य वेळा ऐकल्या. याच दरम्यान मी लायब्ररीची मेम्बरशिप सुद्धा घेतली आणि एकापाठोपाठ एक .मां.ची पुस्तकं वाचून हसून हसून बेहोष होत गेलो आणि .मा.एकदम आपले वाटायला लागले.

     द.मां.चं 'मिरासदारी' हे पुस्तकही लायब्ररी द्वारेच माझ्या वाचनात आलं. वास्तविक 'मिरासदारी' हे पूर्वीच्या नाना कथासंग्रहांतून प्रसिद्ध झालेल्या .मां.च्या कथांचं संकलन आहे. या पुस्तकाला वा..कुलकर्णींची सुंदर प्रस्तावना आहे. या पुस्तकात .मां.च्या २२ कथा आहेत शेवटी .मां.चा स्वतःच्याच लेखनाचा आढावा घेणारा 'माझ्या विनोदाची उलट तपासणी' नावाचा लेख आहे.

     सामान्यतः .मां.च्या कथांमधले संवाद एकदम चुरचुरीत, नमुनेदार आणि 'फर्मास' असतात. माणसं; म्हटलं तर येडीबागडी, अडाणी आणि काहीतरी मूर्खासारखं बोलूनही आपण काहीतरी येकदम 'नामांकित' आणि 'पॉईंटशीर' मुद्दा मांडलेला आहे याची खात्री वाटणारी; असतात. .मां.नी त्यांच्या लहानपणापासूनच असल्या नमुन्याची खेड्यातली माणसं पाहिलेली आहेत, यातच त्यांच्या कथालेखनाचं मूळ आहे. संवादांव्यतिरिक्त .मां.नी केलेली वर्णनं सुद्धा तितकीच खास आणि त्यांच्याच स्टाईलची असतात. ग्रामीण विनोदी कथालेखन ही .मां.ची खासियत आहे हे जरी खरं असलं तरीही; खूप भावनाप्रधान असणाऱ्या, काहीसं कारुण्याचं दर्शन घडवणाऱ्या काही अविस्मरणीय कथाही त्यांनी लिहिल्यात. त्यापैकी 'नव्व्याण्णवबादची एक सफर,' 'कोणे एके काळी,' 'विरंगुळा,' 'गवत,' 'स्पर्श,' अशा काही कथा 'मिरासदारी'मध्ये आलेल्या आहेत. .मां.ची शिक्षक म्हणूनही मोठी कारकीर्द झालेली आहे. त्यामुळे लहान मुलांची विचार पद्धती त्यांच्या चांगलीच परिचयाची आहे. त्यायोगे; लहान मूल हेच कथेचे नायक आहे; अशाप्रकारच्या, 'शिवाजीचे हस्ताक्षर,' 'माझ्या बापाची पेंड,' 'आजारी पडण्याचा प्रयोग,' अशा छान छान कथाही 'मिरासदारी'मध्ये आलेल्या आहेत. 'शाळेतील समारंभ' आणि 'ड्रॉईंग मास्तरांचा तास,' सारख्या झक्कास कथा पूर्णतः शाळेच्या वातावरणातल्या आहेत

     ग्रामीण भागामध्ये बरीच माणसे रिकामी असल्यामुळे तक्क्यामध्ये किंवा चावडीवर गप्पांचे अड्डे जमतात. पानाचे तबक, विड्यांची बंडले आणि चोळायच्या तंबाखू-चुन्याचे बटवे मागेपुढे फिरत असतात. घडलेल्या एखाद्या घटनेची चविष्ट चर्चा होते. अशाच प्रकारची सारी वैशिष्ट्ये .मां.च्या कथांमध्येही दिसतात. .मां.च्या वर्णनामध्येही 'मिलमिशा,' 'गाबड्या,' 'आखूड डोक्याचा,' 'निव्वळ हेंद्रट,' 'चाबऱ्या तोंडाचा,' 'साडंशिटलीचा,' 'लगालगा करणारी बाई,' 'उचलून आपटून उशीच करणारा पैलवान,' 'निव्वळ चित्तर,' असे काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द येतात. 'दन्नादन्नी'चा प्रसंग आलाच तर; एखाद्याने समोरच्या माणसाच्या कानफटात ठेवून दिल्यावर मार खाणाऱ्या माणसाचं कानशील काळंनिळं होतंच पण मारणाऱ्याचा हातही एकदम 'झणझणतो.' वास्तविक 'मिरासदारी'मध्ये भोकरवाडीच्या कथा नाहीयेत पण विषय .मां.चाही आहे म्हणून सांगतो की, .मां.नी बऱ्याच फर्मास कथा लिहून 'भोकरवाडी' हे काल्पनिक गाव आणि त्या गावातली गणा मास्तर, बाबू पैलवान, नाना चेंगट, रामा खरात, शिवा चौगुले, सुताराची आनशी, अशी मस्त पात्रं निर्माण केलेली आहेत.     

     'मिरासदारी'बद्दल बोलायचं तर; चोरून विड्या ओढणाऱ्या शालेय मुलांची कथा 'धडपडणारी मुले'मध्ये आढळते. 'नदीकाठचा प्रकार' या कथेत नदीच्या डोहात वाहत आलेलं एका बाईचं प्रेत आढळतं आणि या घटनेवरून पुढे गाव-गप्पांची कथा उलगडते. 'शाळेतील समारंभ'मध्ये शाळेतल्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाचं विनोदी पद्धतीने वर्णन आहे तर 'विरंगुळा'मध्ये मयत घडल्यानंतर करायच्या कामांमध्ये एक्स्पर्ट असणाऱ्या आणि त्यातच विरंगुळा शोधणाऱ्या एका अगदी सामान्य माणसाची कथा आहे. 'निरोप'मध्ये तर एक साधा निरोप हस्ते-परहस्ते करत करत प्रत्यक्षात कशा पद्धतीने सांगितला जातो; याचं अफलातून धमाल वर्णन आहे. 'बाबू शेलाराचे धाडस' ही कथा म्हणजे; घरात साप शिरल्यामुळे घडणारा अचाट गोंधळ आहे. 'व्यंकूची शिकवणी' आणि 'माझी पहिली चोरी' या कथा तर भरपूर प्रसिद्धच आहेत.

     या तशा साध्या निमित्तामुळे किंवा साध्या प्रसंगामुळे घडलेल्या साध्या कथा असल्या तरी 'भुताचा जन्म,' 'व्यंकूची शिकवणी,' 'निरोप,' अशा काही कथांचा शेवट अत्यंत चमकदार आणि काहीतरी भन्नाट असा आहे.                                             

     तरमुद्दा एवढाच की कधीही काढून कुठल्याही गोष्टीपासून वाचायला लागून 'गॅरेंटीने' मस्त मूड बनवावा; अशी ही 'मिरासदारी' आहे.

--- भाग ) मिरासदारी -- मा प्त -- 
क्रमशः - - भाग #) दिवसेंदिवस

ऋणनिर्देश -- माहिती फोटो 'इंटरनेट'च्या सौजन्याने.

ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील
          
@प्रसन्न सोमण
१०/१०/२०१७.

.मा.मिरासदार

No comments:

Post a Comment