--- हाय रे कंबख्त ---
घरात पाव, जॅम,
वगैरे होतंच ...
चालता चालता सहज स्लाइस चीज सुद्धा घ्यावं, असा विचार मनात आला ... डोक्यात लताची मधाळ गजल 'अगर मुझसे मुहब्बत है'
वाजत होती ... विचारांच्या तंद्रीतच मी दुकानात शिरलो आणि
स्लाइस चीज मागितलं ...
"पांचवाला या दसवाला ?" ... दुकानदारानी विचारलं
"पांचवाला बस्स होगा" ... नकळत मी उत्तरलो.
दुकानदारानी दिलेलं पाकीट पिशवीत टाकलं आणि
खिशातलं पाचचं नाणं काउंटरवर ठेवलं ...
क्षणभर दुकानदारानी ऑ वासल्यासारखी जबड्याची
हालचाल केली ... आणि मग म्हणाला ... "चाचा, पांचवाला मतलब उसमे पांच चीज स्लाइस होते है
... इसका किंमत पचाहत्तर रुपया है" ... (मला फक्त दुकानदार त्या
फेव्हिक्विकला 'पांचवाला' म्हणतात आणि ते खरोखर पाच
रुपयाचंच असतं; हे जाहिरातींमुळे
माहिती होतं) ...
भानावर येऊन मी योग्य पैसे देऊन बाहेर पडलो आणि
मग पुन्हा विचारात पडलो की पांचचं नाणं काउंटरवर ठेवून मी माझं अज्ञान दाखवलं की
विनोदबुद्धी ? ... नाईलाजानी डोक्यातली गजल अकाली बंद
पडली ...
ही व्यवहारी दुनिया; हाय रे कंबख्त ...
@प्रसन्न सोमण. २५/०७/२०२२.
No comments:
Post a Comment