n लकवा –- १.
शीर्षक
- हिरवे पेन्शनर ..... तांबडे डोळे
आज सकाळीच बँकेतून पेन्शन विथड्रॉ करून
झालं होतं..... आजकाल वाढलेल्या महागाईमुळे, हल्ली उठसूट फळं विकत घेणं काही परवडत
नाही; पण सकाळीच पेन्शन काढल्यामुळे आज तरी खिसा थोडासा गरम होता; तेव्हा म्हटलं मंडईतून
थोडी फळं घ्यावी...... म्हणून संध्याकाळी मंडईत फिरत होतो ...... अचानकच माझी नजर गेली
तर ...... समोरच्या भाजीपेक्षाही ताजी ...... सतेज …... टवटवीत अशी 'ती' भाजी घेत उभी
होती ...... मी साहजिकच जवळच रेंगाळत राहिलो ...... म्हटलं, डोळे आपलेच आहेत तेव्हा
बघायला काय हरकत आहे ? ....... असा विचार करून दोन डोळ्यांनी ते आरस्पानी (म्हणजे काय
? …... ) सौंदर्य पीत राहिलो ..... माझा चेहराही बहुदा (शक्य तितका, …… पण माझ्या वर्णामुळे
कोणाच्या बापालाही कळणार नाही अशा बेतानं ……) आरक्त होऊन उठला असावा ….. एकीकडे मनातल्या
मनात सहस्त्रनेत्री इंद्राचा हेवाही करत राहिलो ..... तेवढ्यातच, …...
हाय रे दैवा !! ....... लगेचच ….... 'रोखुनी
मज पाहू नका …...,' असा आविर्भाव चेहऱ्यावर आणून 'ती'चा कृद्ध चेहरा माझ्याकडे वळला
.......
अरेरे ! ...... आता फक्त हा कृद्ध चेहराच
माझ्या नजरेसमोर येत रहाणार ..... हे खो sss ल दुःख उरलेल्या आयुष्यात काळजात बाळगून
मी कसा जगू ? ....... हा हन्त sss हा हन्त !!!
(फोटो इंटरनेटच्या सौजन्याने)
@प्रसन्न सोमण.
१२/०४/२०१८.
स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम,
क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने
लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही
आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण
जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी
असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ...
(क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट
... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत;
म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच
शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)
---------- @@@@@ ----------
No comments:
Post a Comment